आमदार नमिता मुंदडा यांची मागणी!

अंबाजोगाईत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये करावी- आ.मुंदडा

(21 एप्रिल) अंबाजोगाई : प्रशासन काहीही दावे करत असेल तरी एस आर टी रुग्णालयात सहा जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्या नातेवाईकांना नाशिक च्या धर्तीवर शासनाने तातडीने प्रत्येकी पाच लाखाची मदत करावी अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली आहे .

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी दुपारी अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली .नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे 22 लोक दगावले आस्तना दुसरीकडे अंबाजोगाई येथे हा प्रकार समोर आला .

error: Content is protected !!