लग्नात गर्दी जमविणे अंगलट आले, हॉटेल मालक, वधूवरांसह 300 जणांवर गुन्हा दाखल

नेकनूर, दि. 7 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल(kanhiya hotel beed police case) येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला. याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crowds gathered at the wedding, with 300 people, including hotel owners and brides, charged)
धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली असल्याची माहिती नेकनूर पोलीसांना मिळाली. धारुर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होता. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे यावेळी उल्लंघन करण्यात आले.(The Collector’s curfew order was violated at this time 300 people people charaged) त्यामुळे ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून वधु-वर, त्यांचे आई-वडील, मामा, देवबप्पा, हॉटेल मॅनेजर यांच्यासह तीनशे जणांवर कलम 188, 269, 270 भादवि साथरोग आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वेय नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनि.लक्ष्मण केंद्रे, फौजदर विलास जाधव, यांच्यासह कर्मचार्‍यांनी केली.

error: Content is protected !!