चिंताजनक; दिवसभरात 60 हजाराच्या घरात रुग्ण, मृतांचा आकडाही 300 पार

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. (The number of corona patients is around 60,000, while 300 people die due to corona)

राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

error: Content is protected !!