कामात हयगय नको, धनंजय मुंडेंची अधिकाऱ्यांना तंबी

बीड : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. धनंजय मुंडेंच्या ‘फैसला ऑन दि स्पॉट’ कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पार पडले. यावेळी पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच बीडकरांनी या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकास कामांत कमी पडणार नाही, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

ध्वजारोहण पार पाडल्यावर धनंजय मुंडे हे बीडच्या विश्रामगृहात थांबले होते. नेहमीप्रमाणे मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतले. कामात हयगय नको, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

error: Content is protected !!