लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु, पब्जी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं केली होती. तेव्हापासूनच तरुण या गेमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पूर्णपणे भारतीय असलेला FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, FAU-G गेम प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच लॉन्च करण्यापूर्वीपासूनच तरुणाईमध्ये गेमच्या चर्चा आहेत. या गेमचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये पंजाबीमध्ये डॉयलॉग्स ऐकायला मिळतात.
असा करा गेम डाऊनलोड (How to download FAU-G)
फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्ससाठी हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल.
त्याचसोबत हा गेम ऑफिशिअल साईटवरुनही डाऊनलोड करता येईल.
सध्या फौ-जी गेमची ऑफिशिअल वेबसाइट लॉन्च झालेली नाही. तसेच गेमबाबत सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.
कसं कराल फौ-जी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन?
गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे. प्रमोटर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे. प्री-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया गूगल प्ले-स्टोअरवर करण्यात येत आहे.