नांदेड : लोहा येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकाला पळवून आणलेल्या गुन्हेगारावर गोळीबार करून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्या अल्पवयीन बालकाची सुटका केली आहे. हा प्रकार सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास निळा रस्त्यावर,पुयनी पॉईंट जवळ घडला.
मागील कांही दिवसांपासून नांदेडमध्ये गुन्हेगारांची चलती आहे की, पोलीसांची हा प्रश्न अनेकदा उपस्थित होत होता. याला प्रतिउत्तर देत पोलीसांनी आज एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करतांना गोळी चालवली आहे. दि.5 ऑगस्ट रोजी बालाजी मंदिर लोहा येथे राहणाऱ्या जम्मूनाबाई संतोष गिरी यांनी आपला मुलगा शुभम संतोष गिरी (16) वर्ष यास सायंकाळी 4 वाजता मोटारसायकलवर बसवून पळून नेले.
पळवून नेणाऱ्या माणसाची ओळख जम्मूनाबाई गिरी यांना नव्हती. त्यानंतर पळून नेणाऱ्याने मोबाईल क्रमांक 7796330408 वरून जम्मूनाबाईचा मोबाईल क्रमांक 9689044079 यावर फोन करून पैशांची मागणी करत आहे तेंव्हा लोहा पोलीसांनी अज्ञात माणसाने शुभम संतोष गिरीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा क्रमांक 154/2020 असा आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार विष्णुपूरी येथील विकास हटकर या माणसाने शुभम संतोष गिरीचे अपहरण करून आणले आहे आणि सध्या तो निळ्या रस्त्यावर आहे. तेंव्हा पोलीस निरिक्षक आपल्या कांही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचले विकास हटकरकडे बंदुक होती. तो पोलीसांना धमकावत होता. माझ्या जवळ आलात तर शुभम गिरीला मारू टाकेल. या परिस्थितीमुळे पोलीसांची अडचण झाली होती. पण शुभम गिरीला सोडवणे हा सर्वात मोठा उद्देश पोलीसांसमक्ष होता. तेंेव्हा आपल्या परीने पोलीस पथकाने विकास हटकरला बोलण्यात बीझी ठेवले आणि आलेल्या संधीचे सोने करत पोलीस पथकाने विकास हटकरच्या ताब्यातील शुभम गिरीला सोडवले. यावेळी पोलीसांना विकास हटकरवर गोळी झाडावी लागली त्या तो जखमी झाला आहे. जखमी विकास हटकरला पोलीसांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.