विशेष म्हणजे कोरोनाचा हा नवा अवतार अधिकच घातक आणि संसर्गजन्य असल्याचं वास्तव अजूनच चिंता वाढवणारं आहे. आग्नेय ब्रिटनमध्ये सापडलेलं हे कोरोनाचं नवं म्युटेशन सापडलं आहे. ब्रिटन सरकारनं या नव्या अवताराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याचं सांगत 16 डिसेंबरपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतासह सगळं जग कोविड-19 शी यशस्वी लढा देत असताना आता कोरोनानं केलेलं उत्परिवर्तन नवीच डोकेदुखी बनून समोर येतं आहे.
हे वाचा : मला आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो : बच्चू कडू
परदेशातील नागरिकांमुळे काही महिन्यांपूर्वी भारतात कोरोनाचा फैलाव झाला. आणि भारतातही कोरोनाने भयावह रुप धारण केलं होतं. तसंच सध्या नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर आधीच निर्बंध आणले आहेत. यासंदर्भात खबरदारी म्हणून अनेक राज्यांनीही नागरिकांसाठी नवे नियम घालून दिले आहेत. कोणत्या राज्यात कसे नियम लागू करण्यात आले आहेत जाणून घेऊया.
दिल्ली – सरकारने अद्याप कोणतेही निर्बंध घातले नसले तरी लवकरच निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटक – राज्य सराकारने डेन्मार्क आणि यूकेवरुन नुकत्याच आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.
महाराष्ट्र – राज्य सरकारने नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पंजाब – पंजाबमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला असून अलीकडेच परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
केरळ – अद्याप कोणतेही नवे नियम लागू करण्यात आले नाहीत.
तमिळनाडू – एक परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; अद्याप नवे निर्बंध लागू नाहीत.
कोलकत्ता – गेल्या 15 दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू; लवकरच त्यांची तपासणी होणार आहे.
तेलंगणा – तेलंगणा सरकार प्रवाशांची RT – PCR टेस्ट करत आहे. काही अलीकडेच तेलंगणामध्ये आलेल्या प्रवाशांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे.
म्युटेशन म्हणजे काय?
म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV – 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो.