ममता बॅनर्जींचा भाजपला झटका; भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. भाजपनेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग लावत त्यांचे काही अधिकारी आणि आमदार आपल्याकडे घेतले. मात्र ममता बॅनर्जींनी पण भाजपला झटका दिला आहे.

भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता खान यांनी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. सुजाता खान यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्रकारांनी त्यांना पती भाजपमध्ये असताना तुम्ही तृणमूलमध्ये प्रवेश कसा काय केला?, असा प्रश्न केला.

घरातल्या गोष्टी घरातच राहू द्या. भाजपमध्ये मला कधीही सन्मान मिळाला नाही. लोकप्रियतेबद्दल बोलायचं झाल्यास ममता बॅनर्जी यांच्या आसपासदेखील कोणी नसल्याचं सुजाता खान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सुजाता खान यांच्यात काही खटके उडाल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर ममता बॅनर्जींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची जोरदार चर्चा चालू आहे.

error: Content is protected !!