Afghanistan Bomb Blast : बॉम्ब स्फोटांनी पुन्हा हादरलं अफगानिस्तान

 अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी पाच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये किमान 9 लोकांचा मृत्यू झालाय तर इतर 20 लोक जखमी झाल्याचं समोर आलंय. अफगानिस्तानचे इंटिरियर मिनिस्टर मसूद अंदाराबी यांनी या स्फोटाची पुष्टी केली आहे.

अफगानिस्तानमधील अमेरिकेच्या एयरबेसवर रॉकेटचा मारा
अफगानिस्तानात गेल्या काही आठवड्यात अनेक स्फोटांचे प्रकार घडले आहेत. शनिवारी अफगानिस्तानच्या परवान प्रांतात अमेरिकेचा एयरबेस असलेल्या बगराम एयरफील्डवर दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा करण्यात आला होता. यामध्ये कोणतंही नुकसान झाल्याची बातमी अद्याप आली नाही. सूत्रांच्या मते, कलंदर खिलच्या भागात एका ट्रकमधून सकाळी 5.50 च्या सुमारास अमेरिकेच्या बगराम एयरफिल्डवर पाच राउंड रॉकेट डागण्यात आले होते. या रॉकेट्सना अफगानी सुरक्षा रक्षकांनी निकामी केलं.

ATTACK ON US AIRBASE

अफगानिस्तानची राजधानी काबुलपासून उत्तरेकडे जवळपास 500 किमी लांब असलेला बगराम एयरफिल्ड हा अमेरिकेच्या एक प्रमुख एयरबेस आहे. गेली 19 वर्षे अमेरिकन आणि नोटोच्या सैनिकांकडून याचा वापर करण्यात येतोय. या ठिकाणी झालेल्या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली नाही.

यापूर्वी 12 डिसेंबर रोजी काबुल शहराच्या विविध भागात 10 रॉकेट्स डागण्यात आले होते. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर दोन व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबर रोजी शहराच्या विविध भागात किमान 23 रॉकेट्स डागण्यात आली होती. त्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

error: Content is protected !!