पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश महाजन यांचा निकाल

बीड दि.15 (प्रतिनिधी): पत्नीचा छळ करून गळा दाबून खून केल्याप्रकरणी अस्लम याकुब शेख या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी 12 डिसेंबर 2020 रोजी निकाल जाहीर केला. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील बी.एस. राख यांनी काम पाहिले.

हे वाचा : चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, कोल्हापूर भाजपमध्ये उभी फूट


या प्रकरणी थोडक्यात हकिगत अशी की, सन 2010 मध्ये मयत समिना हिचे आरोपी अस्लम सोबत मुस्लीम रितीरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते. आरोपींनी समिनाला दोन वर्षे चांगले नांदवले. घर बांधणीसाठी दोन लाख रूपयांची मागणी करून तीला सतत शारीरीक व मानसिक त्रास दिला. दि. 17 ऑक्टोबर 2017 रोजी पहाटे गळा दाबुन खून केला. सदर प्रकरणी अस्लम याकुख शेख व इतर चार जणांविरूध्द मयत समीना हिचे वडिल शेख रशिद पि.शेख अब्दुल याचे फिर्यादीवरून आरोपी विरुध्द चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 235/ 2017 भां.द.वि. कलम 302,498 (अ), 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. चकलांबा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एम. शेख व पोलीस उप निरीक्षक व्ही.के. जोगदंड यांनी सखोल तपास केला. आरोपी विरुध्द मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचे प्रकरण बीड येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.


सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस महाजन यांचे न्यायालयात झाली. आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, त्याचे नातेवाईक साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व अन्य साक्षीदारांचे जबाब परिस्थितीजन्य पुराव्याचे अवलोकन केले. सहाय्यक सरकारी वकील बी.एस. राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड, एच.एस महाजन यांनी आरोपी अस्तम याकुब शेख रा.गुळज ता.गेवराई जि.बीड यास भादवि कलम 302 प्रमाणे दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर 25 हजार दंड ठोठाव्यात अला. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बी.एस. राख यांनी काम पाहिले. सदर प्रकरणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सी.एस. इंगळे यांनी काम पाहिल. त्यांना पो.हे कॉ. के.व्ही. पालवे यांनी मदत केली.

error: Content is protected !!