मद्यप्रेमींची लूट करण्यासाठी कार्ल्सबर्ग, सबमिल्लर आणि युनायटेड ब्रेवरिज या तीन बड्या बिअर उत्पादक कंपन्यांनी हातमिळवणी केल्याचं उघड झालं आहे. तुम्ही बिअर प्रेमी असाल, तर ही बातमी तुम्हाला किक अर्थात झटका देऊ शकते. बिअरच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ करुवन ग्राहकांची मोठी फसगत समोर आलीय.
या तिन्ही कंपन्यांनी बिअरच्या किंमतीमध्ये फिक्सिंग केल्याची कागदपत्रं समोर आलीय. त्यामुळं मद्यप्रेमींना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागला आहे. कारवाई झाल्यास या कंपन्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो. बिअर तसा अनेकांचा आवडीचा विषय आहे. आरोग्याला मद्य घातक असलं तरी ग्राहकांची यातून फसणवूक होत असल्याचं समोर येत आहे. मद्य कंपन्यांनी हातमिळवणी केल्याने बिअर चाहत्यांना आणि ग्राहकांना याचा फटका बसतोय हे नक्की.