बीड दि.11 (प्रतिनिधी): गेल्या 14 वर्षापासून नियमित प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक जनअकुंश दीपावली वार्षिक विशेषांक नुकताच प्रकाशित झाला. सौ.संगीता नारायण नागरे संपादित विशेषांकाचे विविध मान्यवर, साहित्यिक आणि वाचकांनी स्वागत केले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिवकन्या शिवाजीराव सिरसाट, उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, माजी सभापती युधाजीतदादा पंडीत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा, अपर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (मा.) डॉ.विक्रम सारूक, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, जिल्हा परिषद सदस्य लोढा आदींना दीपावली विशेषांक भेट देण्यात आला. सदर अंकाचे अवलोकन करून मान्यवरांनी वाचनीय असलेल्या अंकाचे स्वागत केले आहे.
हे वाचा : पंकजा मुंडे, रोहित पवार थुकरटवाडीत पहिल्यांदाच एकत्र येणार
सदर वार्षिक अंकात आरोग्य आणि शिक्षणाला महत्व दिले जाते. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर संकटातून सावरण्याचा काळ महत्वाचा आहे. त्यादृष्टीने साहित्यिकांच्या कथा, कवितांना प्राधान्य देण्यात आले आहे. नामांकित साहित्यिकासह नवोदिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण आणि राजकारणालाही स्पर्श करणार्या लेखांचा समावेश आहे. चालू घडामोडीवर आधारित व्यंगचित्र व वात्रटिकामुळे ्रअंकाचा दर्जा वाढला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.