केरळ विमान दुर्घटना समजून घ्या दुर्घटनेचं कारण

कोझीकोडः दुबईहून आलेलं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त झालं. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचले होते. त्यामुळे विमान धावपट्टीला मागे सोडून सुमारे ३५ फूट खोल दरीत पडलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले. या दुर्घटनेत दोन पायलट आणि १४ प्रवासी अशा एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानतळाचा टेबलटॉप रनवे असल्याचे कारणाने विमानाला अपघात झाला असे सांगतिले जात आहे. कारण सामान्यत: अशा विमानतळावर विमानांचे लँडिंग करणे धोकादायक मानले जाते. विमानतळावर विमानाचे लँडिंग योग्य पद्धतीने झाले नाही, असं तज्ज्ञाचं मत आहे.

केरळचे कोझीकोड विमानतळ भौगोलिकदृष्ट्या ‘टॅब्लेटॉप’ आहे. म्हणजेच या विमानतळाच्या धावपट्टीच्या सभोवताल दरी आहे. टेबलटॉप रनवेबाबतीत सांगायचे तर हा रनवे संपल्यानंतर अधिक जागा नसते. यामुळे कोझीकोड विमानतळावरील धावपट्टी संपल्यानंतर विमान ३५ फूट खोल दरीत पडले. खाली पडताच विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले. पण सुदैवाने विमानाला आग लागली नाही. संध्याकाळी ७.४१ वाजता विमानाला अपघात झाला.

टॅबलेटॉप रनवे म्हणजे काय?

टॅब्लेटॉप रनवेच्या दोन्ही बाजूंनी किंवा एका बाजूला दरी असल्याने टॅब्लेटॉप रनवेचा धोकादायक असतो. अशा परिस्थितीत विमानाच्या लँडिंग आणि उड्डाण दरम्यान दोन्ही गोष्टींमध्ये बराच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यामुळे या विमानतळांचे पायलटही अतिशय कुशल असतात. बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात. देशात कर्नाटकातील मंगलोर, केरळमधील कोझीकोड आणि मिझोरममध्ये टॅबलेटॉप रनवे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!