T20 wordcup 2021:अखेर ठरलं! टी-20 विश्वचषक 2021चं यजमानपद या देशाला

आयसीसीने यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. याबरोबरच आयसीसीने 3 मुख्य स्पर्धांसाठीचे कालावधीही निश्चित केले होते.

यामध्ये 2021 आणि 2022 ला होणाऱ्या 2 टी-20 विश्वचषक आणि भारतात होणाऱ्या 2023 च्या वनडे विश्वचषकाचा समावेश होता. आयसीसीने आता टी-20 विश्वचषकांच्या यजमानपदाबद्दल खुलासा केला आहे. त्यानुसार आधी ठरल्याप्रमाणे भारताकडे 2021 ला होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचं यजमानपद देण्यात आलंय. तर 2022ला ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकाचं यजमानपद सांभाळेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. शुक्रवारी आयसीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषकांविषयी चर्चा केली आणि पुढच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यास त्यांनी परस्पर सहमती दर्शविलीये. याबरोबरच पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वनडे विश्वचषकही पुढे ढकलला आहे.

18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये यंदाच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असून आयपीएलचा 13 सीजन युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!