धक्कादायक: बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलगा ठार

बीड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात बिबट्याची दहशत कायम असताना आणि आष्टी तालुक्यात आठवडा भरपूर्वीच एकजनाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी किन्ही गावात एका दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे . मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात बिबट्याने दहशत करत आष्टी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील एका शेतकर्‍याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची व शिरूर कासार तालुक्यातील महिलेवर हल्ल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी बिबट्याने एका 10 वर्षीय बालकावर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. किन्ही (ता.आष्टी) येथे ही घटना घडली.

बीड जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात मागील काही महिन्यांपासून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी शेतकरी आणि नागरिक करत होते .पैठण तालुक्यातील आपेगव येथे बापलेकावर हल्ला केल्यानंतर दुसरी घटना आष्टी तालुक्यात घडली होती .

स्वराज सुनील भापकर (रा.भापकरवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे त्या बालकाचे नाव आहे. तो आईसह आजोळी आलेला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो नातेवाईकांसोबत शेतात गेलेला होता, नातेवाईक पिकाला पाणी देत असताना अचानक बिबट्याने स्वराजवर हल्ला केला, त्याला तोंडात पकडून काही अंतरावर नेऊन ठार केले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यात बिबट्या दिसला, अशा चर्चांना उधाण आले असून आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचा : अबब… विनामास्क फिरणाऱ्या आठशे जणांवर कारवाई

error: Content is protected !!