मुंबई | भारतीय नौदलाचं प्रशिक्षक MiG-29K विमान अरबी समुद्रात कोसळलं आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.
MiG-29K Trainer Jet Crashes Into Sea, Pilot Saved, Search On For Other
या विमानाच्या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. यामध्ये बचावकर्त्यांच्या टीमकडून एका वैमानिकाला वाचवण्यात यश आलंय.
भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आलीये. भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षक विमान 26 नोव्हेंबर रोजी पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये एका वैमानिकाचा शोध लागला असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध हवाई तसंच समुद्रमार्गे घेतला जातोय.
MiG-29K या विमानाचं यापूर्वी देखील अपघात झाला आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.