मुंबई | सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. ही मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली.
Chief Minister Uddhav Thackeray interview in samana
त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे, आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही मुलबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदुळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू”.
मी शांत संयमी आहे याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. तसेच त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला चांगलेच ठणकावले आहे.