एकमेकांचं तोंडंही न पाहणारे सरकार चालवतायत- रावसाहेब दानवे

परभणी | भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे सरकार पडेल असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.

रावसाहेब दानवे (ravsaheb danve) म्हणाले, “येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. आणि आपलं सरकार कसं येणार आहे मी लवकरच पत्रकारांना कळवतो.”

दरम्यान कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत असल्याची टीकाही दानवे यांनी केलीये.

तीन वेळेस हा मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाकडे होता. मात्र, गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता, असंही दानवे यांनी सांगितलं.

error: Content is protected !!