मुंबईत सध्या कोरोनाची संख्या कमी -जास्त होत आहे या मुळे आता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.असा आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिला आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मुंबईतील शाळा आता ३१ डिसेंबर पर्यंत बंद असणार आहे .
मात्र राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहे. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवणं मुंबई महापालिकेसाठी गरजेचं आहे.
मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या.
त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी गरजेचं आहे.”