एका डॉक्टरानं महिलांना घाबरवून जबरदस्ती त्यांचे ऑपरेशन केले. याप्रकरणी या डॉक्टराला तब्बल 465 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वॉरिअर्स म्हणून जगभरात मान मिळाला. कोणत्याही परिस्थित आणि संकटात अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत घडली आहे.
अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जावेद परवेझवर यांच्यावर जबरदस्ती रुग्णांचा ऑपरेशन केल्याचा आरोप आहे. न्याय विभागाने सोमवारी या आरोपी डॉक्टरला शिक्षा सुनावली. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी जबरदस्ती महिलांचे ऑपरेशन करून विमा कंपन्यांकडून पैसे घेतले. अनेकदा डॉक्टर परवेझ खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्स बिल करायचे. माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या 10 वर्षात डॉक्टरांनी लाखो-करोडो रुपये कमावले.
न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार, परवेझ गर्भवती महिलांना अनावश्यक ऑपरेशनसाठी तयार करायचे. रूग्णांना शस्त्रक्रिया करण्यास सांगायचे. इतकेच नव्हे तर कॅंसरपासून वाचवण्यासाठी त्यांनी रुग्णांना अनेकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या नॉरफॉक फील्ड ऑफिसचे प्रभारी विशेष एजंट कार्ल शुमन म्हणाले की, “डॉक्टर, अधिकारी हे असलेले लोक त्यांच्या रूग्णांचे नुकसान होणार नाही अशी शपथ घेतात.मात्र परवेझ यांनी जबरदस्ती रुग्णांनी शस्त्रक्रिया करून आपल्या रुग्णांना वेदना आणि चिंता दिल्या. त्यांच्याकडून पैसे लुटले”. परिणामी परवेझ यांना 465 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.