यावर्षात बॉलिवूडला अनेक धक्के सहन करावे लागले. प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री आणि कलाकारांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा असताना सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. हरीश बंचता असे या अभिनेत्यानं नाव असून त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हरीश हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबासोबत असताना त्यांचा कोरोनाची लागण झाली. यातच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
शिमलामध्ये राहणार हरिश गेल्या 18 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. 48 वर्षीय दिवंगत हरिश यांनी बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बजरंगी भाईजानमधील त्यांच्या भुमिकेचे सर्वांनीच कौतुक केले. या चित्रपटात हरिश यांनी पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
हरिश यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. एक दिवसआधी त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लागोपाठ माय-लेकाच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हरिश यांनी सीआयडी आणि क्राइम पेट्रोलमध्येही अभिनय केला केला आहे. हरिश यांना ताप आल्यामुळे रोहडूहून आयजीएमसी येथे हलविण्यात आले. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.