व्हॉट्सअॅपही आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फीचर देण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील व्हॉट्सअॅपने नवं फीचर लाँच केले आहे. Disappearing Messages असे या फीचरचे नाव आहे. या महिण्याच्या शेवटी युझर्सना या फीचरचा लाभ घेताना येणार आहे. Disappearing Messages फीचर तुमच्या व्हॉट्सअॅपमधील जुने मेसेज आणि चॅट्स ऑटोमॅटिक डिलीट करेल. जगभरात कोट्यवधी युझर्स मेसेज, फोटो, व्हिडीओ शेअरिंगसाठी व्हॉट्सअॅप चा वापर करतात.
फेसबुक च्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअॅपने फेसबुकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या नवीन फीचर बद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Disappearing Messages फीचर युझर्सचे मेसेज वाचुन झाल्यावर काही काळानंतर ऑटोमॅटिक डिलीट करेल.