कोरोना व्हायरसच्या संकटातही BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वाचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ही लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ IPL 2021साठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर दोन्ही संघ पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठीच्या ऑक्शनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं नव्यानं संघ तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. पण, त्याचा या निर्धाराला धक्का बसण्याची शक्यता आहे.
KXIP संघातील काही मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्याच्या तयारीत आहेत, तर CSK संपूर्ण कायापालट करणार आहे. त्यामुळे IPL 2021साठीच्या लिलावाची वाट पाहत आहेत. शेन वॉटसननं नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तो पुढील आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्याशिवाय केदार जाधव, पीयूष चावला, कर्ण शर्मा आणि मुरली विजय यांना CSK रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, CSKचे हे स्वप्न BCCIच्या निर्णयावर अवलंबून आहे. पुढील वर्षी बीसीसीआय मेगा ऑक्शन किंवा मिनी ऑक्शन घेणार की नाही, यावर CSKचं भविष्य अवलंबून आहे. दरम्यान, कोरोनामुळे IPL 2021चं ऑक्शन होणार नसल्याच्या चर्चाही येत आहेत. पण, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले. ”अजून आम्ही काही ठरवलेले नाही. IPL 2020 संपूद्या आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ,”असे गांगुलीनं सांगितले.