काळजी घ्या… कोल्हापूरात आणखी एका संकटाचे सावट

कोल्हापूर – शहरातील प्रभाग क्र. १६, १९, २५, ३, ३७, ४५, ६१, ७१ व ७८ या ९ प्रभागात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत राबविली. १२७१ घरांची तपासणी केली असता घरातील कंटेनर यामध्ये फ्रीज, बॅरेल, सिंटेक्‍स टाक्‍या, कुंड्या, टायर आदी २०७५ बाबींची तपासणी केली. यामध्ये ८३ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध व धूर फवारणीवरही भर दिला आहे.

हे वाचा : आता राज्यातील शाळा होणार सुरू

महापालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत आज ९ प्रभागांतील १२७१ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०७५ कंटेनर तपासले. त्यामध्ये ८३ ठिकाणी डेंग्यू अळ्या आढळल्या असून, त्या टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

यापुढेही ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी, तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाइपला जाळी बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या, फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही, अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंग्यू, चिकुनगुण्या नियंत्रित ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.


error: Content is protected !!