महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. काल रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली.
हे वाचा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण
या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे.