धक्कादायक : चालत्या कारमध्ये बलात्कार

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परत जात असताना या युवतीला जबरदस्तीने दोन तरुणांनी कारमध्ये बसवून चालत्या कारमध्ये बलात्कारा ची घटना घडवून आणली. ही घटना पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. पंजाबमधून एक अतिशय लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

हे वाचा : आयकर भरण्याची तारीख वाढवली, करदात्यांना मोठा दिलासा

पीडित मुलीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपी तिचे मित्र आहेत आणि एका खासगी हॉटेलमध्ये काम करतात. आम्ही आमच्या मित्राच्या वाढदिवशी पार्टी साजरी करायला गेलो होतो.

घटनेच्या दिवशी ते वाढदिवसाच्या पार्टीनंतर लुधियानाच्या सराभा नगरला परत जाणार होते, दोन्ही आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले त्यानंतर एका आरोपीने वाहन चालविणे चालू ठेवले आणि इतर आरोपीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला कारमधून रस्त्यावर खाली फेकून दोघे पळून गेले.

पोलिसांनी आरोपींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेत वापरलेली गाडी ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती सराभा नगर पोलिस स्टेशन प्रभारी यांनी दिली. पोलिस आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहेत.

error: Content is protected !!