पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स संघ

IPL 2020 :- आयपीएल 2020 मध्ये चेन्नईला 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 

IPL 2020 : तीन वेळा आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल 2020 मध्ये मात्र फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही. सोमवारी अबूधाबी येथे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सने कालच्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे संघ 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयपीएल 2020 मध्ये चेन्नईला 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाने आतापर्यंत केवळ तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे पण वाचा :- स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!

दिल्ली कॅपिटल्स पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर

सात सामने खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईच्या संघाने नऊ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे. ज्यांनी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान, बंगलोरचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी आहे. चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. ज्यांनी नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब प्रत्येकी तीन सामने जिंकल्यामुळे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

error: Content is protected !!