रोज आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता तरूणी पडली प्रेमात, पाणीपुरी वाल्यासोबत झाली फरार..

पाणीपुरीचं दुकान समोर असेल आणि खाण्याची इच्छा झाली नाही असं सहसा होत नाही. खासकरून पाणीपुरीच्या ठेल्यावर महिला आणि तरूणी अधिक बघायला मिळतात. पण तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली. पाणीपुरी खाता खाता तरूणीचं दुकानदारावर प्रेम जडलं आणि ही तरूणी त्याच्यासोबत फरार झाली.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये एक तरूणी पाणीपुरीवाल्यावर प्रेम करू लागली आणि दोघेही फरार झाले. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जनपदमध्ये पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या व्यक्तीवर पाणीपुरी खाताना- खाऊ घालताना तरूणीच्या मनात प्रेम निर्माण जाल. प्रेमाचा पारा असा काही चढलेला होता की, दोघे फरार झाले. पण त्याचा प्लॅन फेल झाला. पोलिसांनी तरूणीला ताब्यात घेतलं असून तिला तिच्या परिवाराकडे सुपुर्द करण्यात आलं. बदनामी होऊ नये म्हणून तरूणीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाही.

झालं असं होतं की, तरूणी रोज पाणीपुरीच्या ठेल्यावर जात होती. तिला या ठेल्यावरील पाणीपुऱी फारच पसंत होती. पण लोक हे समजूच शकले नाही की, पाणीपुरी खाता-खाता तिला पाणीपुरीवाल्यासोबतच प्रेम होईल. आता प्रेमात पडलेच तर पाणीपुरीवाल्याने त्याचा ठेला बंद केला आणि आपल्या घरी झांसीला फरार झाले. पण तो घरी पोहोचण्याआधी पोलीस तिथे पोहोचले होते. पोलिसांनी तरूणीला परिवाराकडे सोपवलं. सध्या हा विषय परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, लॉकडाऊनमध्ये झांसीला राहणारा एक २०-२२ वर्षांचा तरूण कछवा बाजारात पाणीपुरी विकण्याचं काम करत होता. यादरम्यान याच भागात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याच सूत जुळलं आणि ते दोघेही फरार झाले. आम्ही तरूणीला झांसीमधून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार न मिळाल्याने खटला दाखल केला गेलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!