नेकनूर : रान डुकरं पिकांची नासाडी करत असल्याने काही शेतकरी तारेचे कुंपन लावून त्या विद्युत प्रवाह सोडतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. असाच प्रवाह मांजरसुंबा येथे एका शेतकर्याने तारेत सोडल्याने त्या तारेला चिटकून १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रान डुकरांनी धुमाकूळ घातला. हे रान डुकरं पिकांची नासाडी करतात. यावर प्रतिबंध म्हणून काही शेतकरी तारेत विद्युत प्रवाह सोडतात. नेकनूर परिसरातील मांजरसुंबा येथील बाजीराव आश्रुबा चोरमले यांनी डुकराच्या प्रतिबंधासाठी तारेत विद्युत प्रवाह सोडला. या तारेला नेकनूर येथील सईद उर्फ जुनेद अली हा मुलगा चिकटल्याने त्याचा रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी नेकनूर पोलिसात शेतकर्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी नेकनूर ठाण्याचे रोटे, शिंदे, यूनुस बागवान यांनी धाव घेतली होती. याचा अधिक तपास जाधव हे करत आहेत.