योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी- नवाब मलिक

मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील उत्तर प्रदेश सरकारने संंबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करणाची घोषणा केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नार्को टेस्ट करावी, असं म्हटलं आहे.

हाथरस प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट जरूर करावी. मात्र हे सर्व अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून काम करत होते त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांची नाही तर योगी आदित्यनाथ यांचीही टेस्ट करण्याची मागणी नबाव मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, युपी पोलिसांनी परस्परपणे पीडीतेवर अंत्यसंस्कार केले आणि याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नाही.

error: Content is protected !!