मोदींनी 10 हजार फूट उंचीवर बनलेल्या जगातील सर्वात लांब ‘अटल टनेल’ बोगद्याचे उद्घाटन केले.

  • हायवेवरील जगातील सर्वात मोठा बोगदा असलेल्या अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतक येथे केले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा ‘अटल बोगद्याचे’ आज शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले.  जवळपास 10 हजार फूट उंचीवरर बनलेला हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी 9.2 किमी आहे. हे बनवण्यास 10 वर्षांचा काळ लागला.

हे हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बांधले गेले आहे. यामुळे मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी होईल आणि चार तासांची बचत होईल. याचे नाव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर आहे.

हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. या उद्घाटन समारोहात पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. या बोगद्यामुळे आता मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. तसेच संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ९.०२ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे. या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा.

हे पण वाचा : – 9 वर्षाच्या मुलीवर वडिलांनीच केला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिमाचलमध्ये घालवलेल्या दिवसांची स्मृती जागवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत मोदी नेहमीच येथे येत असत. आज केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचेच स्वप्न पूर्ण झाले नसून, आज हिमाचल प्रदेशातील कोट्यवधी लोकांची दशकांपासूनची प्रतीक्षा संपलेली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यातून काय फायदा होईल?

  • बोगद्यामुळे मनाली आणि लाहोर-स्पीती व्हॅली 12 महिने जोडलेले राहिल. मुसळधार हिमवृष्टीमुळे या खोऱ्याचा सहा महिने संपर्क तुटतो. बोगद्याचे दक्षिण पोर्टल मनालीपासून 25 कि.मी. अंतरावर आहे. तर उत्तर पोर्टल लाहुल खोऱ्यामध्ये सीसूच्या तेलिंग गावाजवळ आहे.
  • बोगद्यातून जात असताना, सपाट रस्त्यावरुन जात असल्यासारखे वाटेल, परंतु बोगद्याच्या एका भागात आणि दुसर्‍या भागात 60 मीटर उंचीचा फरक आहे. दक्षिण पोर्टल समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर आहे, तर उत्तर पोर्टल 3060 मीटर उंच आहे.
error: Content is protected !!