- आजीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
- त्या विरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई – डोबिंवलीच्या रामनगरमध्ये एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्या विरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी डोंबिवली पूर्वमध्ये तिच्या आजीसोबत राहते. गुरुवारी दुपारी ही मुलगी आपल्या वडिलांच्या घरी खेळायला गेली होती. दरम्यान, वडिलांनी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी कसं तरी वडिलांच्या तावडीतून सुटली आणि आजीच्या घरी पोहोचली. आजीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- शरद पवारांना वाटतेय ‘ही’ भीती ; अयोध्येनंतर काशी, मथुरेची चर्चा
मुलीची आई टीबीच्या आजाराने त्रस्त आहे
पोलिस तपासणीत मुलीच्या आईला टीबी असल्याचे निदर्शनास आले आहे आणि म्हणून ती माहेरी गेली आहे. दरम्यान मुलगी वडिलांच्या घरी खेळायला आली. यावेळी पित्याने तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलगी नराधम पित्याच्या तावडीतून सुटून आजीच्या घरी आली. आजीला सर्व हकिकत सांगितली. यानंतर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता आणि लॉकडाउनमुळे कित्येक महिन्यापासून बेरोजगार होता. आरोपीची मुलगी रात्री आईसह राहत होती.
रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आहेर म्हणाले, “गुरुवारी मुलगी खेळायला वडिलांच्या घरी गेली. आरोपी झोपला होता, मात्र मुलीला एकटे पाहून त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. मुलगी कसं तरी तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि आजीच्या घरी गेली. प्रकरण आमच्याकडे येताच आम्ही आरोपीला काही तासांत अटक केली.”