नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) अनलॉक 5 (Unlock 5) चे गाईडलाईन्स (Unlock 5.0 Guidelines) जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनलॉक-5 मध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 5 मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार 5 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतांची अट असणार आहे.
यूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.