AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट,सुशांतसिंहची हत्या की आत्महत्या?

नवी दिल्लीः आता एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? पुराव्यांच्या आधारावर सीबीआय निर्णयावर घेईल. ऑटोप्सी आणि व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयला सोपवण्यात आला आहे. सीबीआय या अहवालाची अन्य पुराव्यांशी तुलना करेल. अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करेल.


सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला होता. पण आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्व दृष्टीकोनातून करण्यात येत आहे आणि सुशांतच्या मृत्यूची व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. या प्रकरणात आता सुशांतचं कुटुंबीय आणि त्याच्या बहिणींची चौकशी सीबीआय करू शकते.


विकास सिंह म्हणाले

सुरवातीला ज्या वेगाने या प्रकरणाची चौकशी केली गेली त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी थंडावली आहे. या प्रकरणात जशी दिरंगाई होतेय तसे पुरावे संपत चालले आहेत. लवकरच या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली पाहिजे, असं विकास सिंह म्हणाले. अभिनेता सुशांतसिंह १४ जूनला वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.

error: Content is protected !!