महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात कृषी विधेयकांवर अंमलबजावणी होणार नाही. त्यांनी म्हटलं, “संसदेत पारित केलेली विधेयकं शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आम्ही याचा विरोध करत आहोत. महाविकास आघाडीसुद्धा या विधेयकांना विरोध करणार आहे आणि या विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही. शिवसेनाही आमच्यासोबत आहे.”कृषी विधेयकं काय आहेत?
केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं आहे. या विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जातायत, ते आधी पाहूया.पहिलं विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक. हे विधेयक कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत 
कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री
कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे
मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे
इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे