कोलकाता | लॉकडाऊनमध्ये देशभरातील चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तर आता पश्चिम बंगालमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्याची परवानगी दिली आहे. ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या, नाटक, चित्रपटगृह, म्युझिकल आणि नृत्य कार्यक्रम यांना 1 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात येत आहे.
त्या पुढे म्हणाल्या, या सर्व ठिकाणी 50 पेक्षा कमी जणांची उपस्थिती असेल. यादरम्यान सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. त्याचप्रमाणे मास्क आणि इतर नियमांचेही पालन करावं.