बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी तिघा आघाडीच्या अभिनेत्रींची शनिवारी एनसीबीनं कसून चौकशी केली. दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान अशा तिघींची एनसीबीच्या एसआयटीतील पाच सदस्यीय पथकानंचौकशी केली. दीपिका आणि करिश्मा प्रकाश या दोघींची एनसीबी गेस्ट हाऊसवर चौकशी करण्यात आली. धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसाद याला एनसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी एनसीबीने क्षितीजची जवळपास २४ तास चौकशी केली होती.
दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येतेय. २०१७ चे ‘ते ‘ व्हॉट्सअप चॅट झाले होते, अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचेही समोर येत आहे.
तसेच अभिनेत्री सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली.