भाजपला पंजाबमध्ये मोठा झटका, भाजप मधून अकाली दल बाहेर

कृषी विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

शिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता. महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात सांगितलं की, 1 ऑक्‍टोबर रोजी शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये मोठा शेतकरी मोर्चा काढेल आणि राष्ट्रपतींच्या नावाने राज्यपालांकडे निवेदन सोपवेल.

तसंच, NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय शिरोमणी अकाली दलाच्या सर्व नेत्यांनी एकमताने घेतल्याची माहितीही सुखबीर सिंह बादल यांनी दिली.”कृषी विधेयकासंदर्भात ज्यावेळी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश आणण्यात आले होते, त्यावेळीही हरसिमरत कौर यांनी अध्यादेशाला विरोध केला होता आणि शेतकऱ्यांच्या भावनांनुसार त्यात बदल करण्यास सुचवले होते. मात्र, आमचे ऐकले गेले नाही,” असा दावा सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे.

error: Content is protected !!