मुंबई | सुशांत सिंह मृत्यु प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज प्रकरण समोर आलं. त्यांनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(NCB) चौकशीत अभिनेत्री सारा अली खानचं(sara ali khan) नाव समोर आलं. चौकशीवेळी साराने सुशांत आणि तिच्या नात्याची कबुली दिली आहे.
सुशांत आणि मी रिलेशनशीपमध्ये होते. 2018 साली केदारनाथ(Kedaranath movie) या चित्रपटाच्यावेळी आमची ओळख झाली होती. सुशांत ड्रग्जचं सेवन करत असल्याचं साराने म्हटलं आहे. दरम्यान, सुशांत आणि मी थायलंडला ट्रिपला गेलो असल्याचंही साराने तपासावेळी सांगितलं