संजय राऊत-फडणवीसांच्या गुप्त भेटीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. दरम्यान, भाजप मधील नेत्यांनी राजकारणात काहीही शक्य आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने शंकेला वाव असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस(devendra fadanvius) यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

भेटीविषयी भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक अत्यंत सूचक असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘अशा भेटी होतच असतात’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे या भेटीच्या वृत्ताला दुजोराच दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंद दाराआड काही तरी महत्त्वाची चर्चा झाली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे

दरम्यान, याबाबत चंद्रकांत पाटील (chandrankat patil) यांना जेव्हा माध्यमांनी आपली प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. पण मला याबाबत कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. पण या भेटीबाबत म्हणत असाल तर राजकीय क्षेत्रात अशा भेटी होत असतात. त्यात बातमी असतेच असं नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडणार अस आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

error: Content is protected !!