नागपूर : नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोले पेट्रोल पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील घरापासून अर्धा किमी अंतरावरच ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बाल्या बिनेकराचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. हल्लेखोरांनी आज बाल्या बिनेकरच्या कारमागे बाईकने पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळ आल्यावर त्यांनी बाल्याची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी बाल्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाल्या बिनेकरचा जागीच मृत्यू झाला.
या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाल्या बिनेकरचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता हा गँगवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बाल्याची हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा अंदाज गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नागपूर मध्ये मुंबई सारखे अंदारवर्ड सारखे नागपुरात याआधीदेखील अशाप्रकारचे घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात एककीडे कोरोनाचा कहर असताना गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याआधी 3 ते 4 जून दरम्यान 24 तासात तीन हत्येच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं (Murder of goon Balya Binekar)