मोकाट जनावरे सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास मालकांवर होणार कारवाई

बीड | मोकाट जनावरे शहरामध्ये सगळीकडे फिरताना आपण पाहतो हि मुकी जनावरे दिसेल ते खात आणि त्यामुळे या जनावरांचा आरोग्याचा त्रास होताच पण त्या सोबत नागरिकांना सुद्धा त्रास होतो. र्वजनिक ठिकाणी तासन- तास ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांसह वाहनधारक त्रस्त होतात. किती जरी होर्न दिला तरी मोकाट जनावर जागचे हलत नाही शेवटी गाडी सोडून जनावर हाकलावे लागेत. मात्र त्यांच्या मालकांच याकडं अक्षम्य दुर्लक्ष होत आल्यानं वाहतूक कोंडीसह अपघाताला निमंत्रण मिळते.

मोकाट जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था न केल्यास त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद आहे. तरी मोकाट जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था करण्यासाठी येथील नगर पंचायतीने त्यांना 3 दिवसांची डेड लाईन दिली असून यानंतर नगर पंचायत हद्दीत मोकाट जनावरांनी प्रवेश केल्यावर त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याच नगर पंचायत प्रशासनं जाहीर केलं आहे. 

शिरूर कासार शहरात सार्वजनिक ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेत कायम मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. त्यातच ही जनावरे  रस्त्याचं ठाण मांडून बसतात. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांना कसरत करत मार्ग काढावा लागतो. मोकाट जनावरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न उदभवतो. यामुळं नागरिक, वाहनधारकांसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरते. शिवाय अपघाताला निमंत्रण मिळत असून दुर्देवाने दुर्घटना घडल्यास त्यास कोण जवाबदार असा प्रश्न निर्माण होत असताना मोकाट जनावरांच्या मालकांसह नगर पंचायत प्रशासना विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. फळभाजी विक्रते दुकानदार यांचं मोकाट जनावरांमुळे नुकसान होत आहे. 

गत सहा महिन्यांपूर्वी मोकाट जनावरांचा शिरूर शहरात संचार वाढल्यानं त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा मोकाट जनावरांच्या मालकांनी याकडं गांभीर्याने घेत नसल्याचं शिरूर कासार नगर पंचायतीला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे नगर पंचायतीच्या हद्दीतील क्षेत्रात किंवा सार्वजनिक ठिकाणी मालकांनी त्यांच्या गुरांना प्रवेश करू देऊ नये. सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ किंवा रस्त्यावर मोकाट जनावरे आढळून आल्यास त्यांच्या मालकांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह ५ हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद आहे. यामुळे तीन दिवसांच्या आत मोकाट जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची व्यवस्था तीन दिवसांच्या आत करावी अन्यथा आशा मोकाट जनावरांच्या मालकांविरोधत दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात येतील, असे शिरूर कासार नगर पंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

error: Content is protected !!