मनीष सिसोदिया यांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. संसर्ग असल्याने ते 14 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय सत्रात सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर त्याचा ताप आला आणि त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली. त्यामुळे बुधवारी त्यांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचा : राज ठाकरे हा मराठी चित्रपट पाहून काय म्हणाले…
पॉझिटिव्ह असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आता डेंग्यू (dengue) झाला आहे. कोरोनाव्हायरसमुळे ऑक्सिजन आणि आता डेंग्यूमुळे त्यांचे ब्लड प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. त्यांना आता दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांना डेंग्यू झाला आहे आणि आता पुढील उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात (Max Hospital) हलवण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनावर (Corona) मात करणारे गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती आता गंभीर झाली आहे, ते लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. 5 ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.
काही दिवसांपूर्वीच त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनीदेखील 19 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत आपल्या वडीलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. माझे वडील आता व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे. त्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे”, असं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं होतं.
आज 24 सप्टेंबरला हॉस्पिटलने (Hospital) त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनसार, “गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत”
23 सप्टेंबरलाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.Covid चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री Coronavirus ला बळी पडले आहेत.