एनसीबीने ड्रग्स (Drugs) केसमध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर आणि सिमोन खंबाटा यांना चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात (drugs case) बॉलिवूडमधील (bollywood) अनेक मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत.
हे वाचा : फोन पे आणि गुगल पे वरून पेमेंट करत असाल तर …
पुढील तीन दिवसात सर्वच अभिनेत्रींना एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल. यादरम्यान केआरकेने चौकशीआधीच भविष्यवाणी केली की, दीपिकाला (Dipika Padukon) तुरूंगात जावं लागणार आहे. ट्विट करून केआरकेने असा दावा केलाय.
दीपिका पादुकोणबाबत केआरकेने लिहिले की, ‘एनसीबी (NCB) लवकरच दीपिकाची चौकशी करणार आहे. यातून वाचण्यासाठी दीपिकाने ७ वकिलांची टीम तयार केली आहे. मला असं वाटतं की, दीपिकाने काहीही केलं तरी तिला तुरूंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. दीपिकाचं तुरूंगात जाणं निश्चित आहे’.
त्यानंतर केआरकेने करण जोहरवरही निशाणा साधलाय. दुसऱ्या एका ट्विटमध्ये केआरके ने लिहिले की, ‘करण जोहरची मैत्रीण सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली की, फिल्ममेकर्सच्या पार्टीत ड्रग्सचा (drugs case)मोठा वापर होतो. मी तर नेहमीच हे सांगत होतो. वाईट वेळ आल्यावर मित्रही वैरी बनतात’.
केआरके इतक्यावरच थांबला नाही तर पुढील ट्विटमध्ये त्याने रणवीर सिंह आणि तापसी पन्नूसारख्या (Tapsi Pannu) कलाकारांनाही सुनावले आहे. केआरकेने लिहिले की, ‘तुम्हाला काय वाटतं एनसीबीच्या लिस्टमध्ये आणखी किती स्टार्स येणे शिल्लक आहेत. यात दीपिकाचं नाव आलं त्यामुळे रणवीर सिंहचं (Ranveer Sing) तर येणारच. अनुराग कश्यपंही नाव यात आहे. अशात त्याच्या मैत्रिणी रिचा चड्ढा आणि तापसी पन्नूही या लिस्टमध्ये सामिल होतील. या लिस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) नावासोबत आदित्य रॉय कपूरचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. लवकरच मी तुम्हाला आणखी काही बॉलिवूड स्टार्सची नाव सांगणार आहे’.
केआरकेचे हे ट्विट्स अशावेळी समोर आले आहेत जेव्हा एनसीबी बॉलिवूडच्या (bollywood) स्टार्सच्या नावांवरून पडदा उठवत आहेत. नुकताच एनसीबीने टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहरच्या घरी छापा मारला आहे. ड्रग पेडलर अनुज केसवानीच्या चौकशी दरम्यान सनम जोहर आणि अबिगेल पांडेची नावे समोर आली होती. या दोघांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं.