ONGC कारखान्यात स्फोट,2 कर्मचारी बेपत्ता

गुजरात : ONGC याठिकाणी वायूचा दाब कमी करण्याबाबत काम करत होती. आग याच परिसरात लागली आहे. कारखान्याच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी आग पसरलेली नाही, असं डॉ. पटेल यांनी सांगितलं.

हाजिराच्या ONGC कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अडीच वाजता हायड्रोकार्बन वायू जमा झाला त्यानंतर 3 वाजून 5 मिनिटांनी एकामागून एक तीन स्फोट झाले.अग्निशमन दलासह ONGC चं आगनियंत्रण पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पोलीस, CISF तसंच संबंधित शासकीय अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित आहेत. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.”

अग्निशमन दलाचे अधिकारी ईश्वर पटेल यांनीही याबाबत अधिक माहिती दिली.”मुंबईकडून हाजिराकडे येणाऱ्या गॅस पाईपलाईनला ही आग लागली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण काही ठिकाणी वायूगळती सुरू आहे. वायूगळती बंद होत नाही, तोपर्यंत आग काही प्रमाणात कायम राहू शकते. आग आणि गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय दोन ONGC कर्मचारी बेपत्ता असून त्यांचाही तपास सुरू आहे,” असं ईश्वर पटेल म्हणाले.

error: Content is protected !!