बीड जिल्ह्यातील दुकानदारांसाठी हा नियम बंधनकारक

बीड : बीड जिल्यातील सर्व दुकाने ,आस्थापना ,उपहारगृह ,निवासी उपहारगृह इ . आस्थापना मालक-चालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की ,महाराष्ट्रात दुकाने व आस्थापना दुकाने व आस्थापना अधिनियम ,२०१७ अंतर्गत नियम ३५ अन्वये आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे . परंतु मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो तथापि, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.


तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेला महापुरुषाची किंवा गाड – किल्यांची नवे देण्यात येऊ नये .
जो कोणी या अधिनियमाच्या तरतुदीच उल्लंघन करेल अशा आस्थापना चालक -मालका विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व आस्थापना चालकांनी नोंद घ्यावी असे सरकारी कामगार अधिकारी ,बीड यांनी कळविले आहे

error: Content is protected !!