कोल्हापूर | गाव म्हटले की तिथे वाद आलाच आणि कोल्हापूर म्हटले तर काहीतरी हटके असते तसेच आत हा वाद. राधानगरी मधल्या मार्केट चौकात दोन होर्डिंग्ज लागले आहेत. या होर्डिंग्जकडे पाहिल्यानंतर आणि त्याच्यावरच मजकूर वाचल्यावर दोन टीम मधल्या समर्थकात किती खुन्नस भरलीय हे लक्षात येतं. मुंबई इंडियन्सने होर्डिंग्ज लावले आहे अगदी त्याच्या बाजूलाच चेन्नई सुपर किंगच्या टीमचं होर्डिंग्ज लावलं आहे. दोन्ही होर्डिंग्जवर फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेच फोटो आहेत.
काय आहे पोस्टरवरती
मुंबई इंडियन्सच्या पोस्टरवर ‘जल मत बराबरी कर’. ‘नावातच दहशत’ त्याच बरोबर ‘आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात’ असा मजकूर तर चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टरवर ‘धोनी साहेब’ आणि ‘आण्णा गेले बंबात’ असा मजुकर आहे. यावरून दोन्ही समर्थकांमधील इर्षा लक्षात येते.
काही महिन्यापूर्वीच कोल्हापुरात असाच प्रकार घडला होता. पोस्टर वॉर वरून दोन गट आमने सामने आले होते. त्यावेळी भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने चाहत्यांचे कान टोचले होते. त्यामुळे आयपीएलमुळे ग्रामीण भागात गट-तट पडत आहेत असंच दिसतंय. मित्रांनो धोनी काय आणि शर्मा काय हे सगळे खेळाडू आपलेच आहेत. त्यामुळे तुमच्यातले गट-तट मैदानावरच ठेवा, वैयक्तिक पातळीला घेऊन जाऊ नका.
This is my first time go to see at here and i am really happy to read everthing at single place.