जेसन रॉय आणि जो रूट यांना पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर इंग्लंडचा डाव कोसळेल असे वाटत होते. पण, मधळ्या फळीनं दमदार कामगिरी करून इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु बराच वेळ खेळपट्टीवर टीकूनही त्याला अपयशाची मालिका खंडित करता आली नाही. इंग्लंडच्या जो रुटनं भारी चेंडू टाकून त्याचा त्रिफळा उडवला.