उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू

बीड : (Beed) राऊत नानूजी आठवले (वय ७१, रा. तलवाडा ता. गेवराई) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज होते व एका मुलीचे लग्न करायचे होते. या चिंतेतून त्या शेतकर्‍याने दि. १८ सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले होते. उपचार सुरू असताना रात्री साडेसात वाजता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व दोन मुली असून त्यापैकी एका मुलीचा विवाह झालेला आहे.

हे वाचा : ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा

कर्जबाजारी झालेल्या एका शेतकर्‍याने अकरा सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शेतकर्‍याला नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रात्री साडेसात वाजता त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!