मराठा समाज करणार ‘घरोघरी घंटानाद’

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड/प्रतिनिधी: मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. यावेळी दि.१७ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन आणि दि.१८ सप्टेंबर रोजी घरोघरी सांयकाळी ६ वाजता घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा : नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार, चीनची कोरोना लस तयार


बीड शहरातील (Beed City) आशिर्वाद मंगल कार्यालय येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कोविड-१९ (Covid-19) च्या नियमांचे पालन करून बैठक घेण्यात आली.यावेळी मराठा समाजातील तरूणांनी आपआपली मते मांडली. आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रत्येकांच्या मनात चिडही दिसून येत होती. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली.

बैठकीत पहिल्या टप्प्यात दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत येथे मराठा समाजाने अर्धा तास धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक, तलाठी यांना द्यावयाचे आहे. तालुकास्तरावर अर्धा तास धरणे आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन द्यायचे आहे तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. दि.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा समाज आपआपल्या घरी गॅलरीत किंवा घराच्या छतावर घंटानाद आंदोलन करेल, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यापुढे आरक्षण जाहिर केले नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा, बीड (Maratha Kranti Morcha)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!